Monday, May 21, 2012

लग्नपत्रिका


लग्नपत्रिका
!! लोकशाही प्रसन्न !!
कोपरापासून दंडवत, विनती विशेष.
आमच्या येथे लोभी व्यापरयांच्या कृपेने ...अनिच्षित सरकारच्या आशीर्वादाने
चि. भ्रष्टाचार
( स. ग. ळी. क. डे.)
(श्री.कु. प्रसिद्ध सारा काला बाजार यांचे अनिष्ट पुत्र )
यांचा शुभविवाह
चि.सों. का. महागाई
( सा.मा.न्य. जनता )
(श्री. कु. क. रा. आमटे यांची कन्या )
हिजबरोबर काळ्या रात्री १२ वा.२ मि.एच. ऍम. टी. मुहुर्तावर मनाविरुद्ध करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटूब व् मित्रपरिवारासह येवून वधु वरा च्या कानाखाली आवाज काढावेत ही नम्र विनती.
आपले नम्र
श्री. व् सौ. मा रा जोड़े
श्री. व् सौ. स दा वाटलावे
श्री. व् सौ. क र बुडवे
श्री. व् सौ. भ रा खिसे
विवाह स्थळ
जुगार भवन,मटका गल्ली,भाववाढ रोड,सट्टा बाजार शेजारी,४२०
हळदीचे भाव वाढल्यामुले चुना लावला तरी चालेल.
टीप : कृपया घरचा आहेर आणने बधंनकारक आहे.
समस्त कालाबाजार बंधू
आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हं !
चि.खोटे,भामटे,चोरटे,लबाडे

No comments:

Post a Comment